मार्क झुकेरबर्गची फेसबुकमधून गच्छंतीची शक्यता, शेअर होल्डर्सकडून प्रस्ताव

1

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

फेसबुक कंपनीतून संस्थापक मार्क झुकेरबर्गला हटवण्यात यावे या प्रस्तावाला कंपनीच्या शेअरधारकांनी मान्यता दिली आहे. गेल्या काही वर्षात फेसबुकमध्ये जे स्कॅंडल झाले त्याला मार्क जबाबदार असल्याचे शेअर धारकांचे म्हणने आहे.  या प्रस्तावावर मे 2019मध्ये मतदान होईल.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार फेसबुकने यावर बोलण्यास नकार दिलला आहे. तर स्ट्रिंगर या शेअर धारकाने म्हटले आहे की, “फेसबुकची भुमिका ही आपल्या समाजातील आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाची आहे. फेसबुक पारदर्शी असणे ही त्याची आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.” कंपनी बोर्डरूम ही स्वंतत्र आणि जबाबदार असावे अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

केंब्रिज ऍनालिटिका, अमेरिकन निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप यासगळ्याला मार्क जबाबदार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. मार्ककडे सध्या फेसबुकचे 60 टक्के शेअर आहेत.

ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्सलाही आपल्या कंपनीतून काढता पाय घ्यावा लागला होता. मार्कची अवस्था स्टीव्ह सारखी होणार का हे मे महिन्यात होणार्‍या बैठकीत समोर येईल.