पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोर जेरबंद

43

सामना प्रतिनिधी । पुणे

केवळ देशातील दहशतवादी संघटनांचे हस्तकच नाही, तर अन्य देशात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे सदस्यही पुण्यात आश्रय घेत असल्याची धक्कादायक बाब दहशतवादविरोधी प्रतिबंधक विभागाने जेरबंद केलेल्या तीन घुसखोर बांगलादेशी नागरिकांमुळे उघडकीस आली आहे.

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून तीन बांगलादेशी नागरिकांना एटीएसने अटक केली. गेली पाच वर्षांपासून ते पुण्यात बेकायदा वास्तव्य करत होते. ते ‘अल कायदा’ या संघटनेची फ्रण्ट ऑर्गनायझेशन असलेल्या अन्सारउल बांगला टीम (एबीटी) या संघटनेच्या सदस्यांना मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मोहंमद हबीबऊर रहमान हबीब ऊर्फ राज जेसूब मंडल (वय ३१, रा. जि. खुलना, बांगलादेश, सध्या रा. धोबीघाट, वानवडी), मोहमंद रिपन हौसैन (वय २५, रा. जि. खुलना, बांगलादेश, सध्या रा. आकुर्डी) आणि हनान्न अन्वर हुसेन खान (वय २५, रा. जि. शरियतपूर, बांगलादेश, सध्या रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या