बीडमध्ये शाळकरी मुलीवर चाकूहल्ला

सामना ऑनलाईन । बीड

शाळेत जात असलेल्या विद्यार्थिनीवर तरुणाने चाकूने हल्ला केला. ही घटना परळीतील नाथ टॉकीजजवळ सकाळी साडेआठ वाजता घडली. हल्लेखोराने विद्यार्थिनीवर चाकूने तीन वार केले. स्थानिकांनी हल्लेखोराला पकडून बेदम चोपले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्लेखोराचे नाव सतीश मंत्री (२४) असे आहे. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.