पॅरिसमधील हिंदुस्थानी लष्कराच्या ‘राफेल’ कार्यालयात घुसखोरी

8
rafale-modi

सामना ऑनलाईन । पॅरिस

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील हिंदुस्थानचे राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला गेला. राफेलबाबतचे महत्त्वाचे दस्तावेज चोरण्याच्या उद्देशाने घुसखोरीचा हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फ्रान्सबरोबर हिंदुस्थानने 36 राफेल विमाने खरेदीचा करार केला आहे. राफेल लढाऊ विमानांच्या उत्पादनांचे काम पाहण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी हवाई दलाची एक टीम पॅरिसमध्ये आहे. हिंदुस्थानच्या राफेल व्यवस्थापनाचे कार्यालय पॅरिसमध्ये आहे. ग्रुप कॅप्टन रँकच्या एका अधिकाऱयाच्या नेतृत्वाखाली राफेल प्रकल्प व्यवस्थापन टीम काम करते. हार्डडिस्क तसेच कागदपत्रांच्या चोरीच्या उद्देशाने कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला असावा अशी शक्यता आहे. सर्व दस्तावेज सुरक्षित असून पॅरिस पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेची माहिती हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या