अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध, एमआयएमच्या मतीनला धू धू धुतले

mim-corparator-aurangabad

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

समांतर जलवाहिनीसंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आयोजित शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास विरोध करणारा एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याला शिवसेना, भाजपच्या नगरसेवकांनी बेदम बदडून काढले. सभागृहाच्या पहिल्या रांगेपासून ते थेट सभागृहाच्या मागच्या दारापर्यंत त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवत नेले.

सुरक्षा रक्षकांनी कडे करून त्याला आपल्या ताब्यात घेऊन सभागृहाबाहेर नेल्यामुळे नगरसेवकांच्या तावडीतून त्याची सुटका झाली. दरम्यान, सय्यद मतीन याचे नगरसेवकपद कायमस्वरूपी  रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आणि त्याला पुन्हा सभागृहात पाय ठेवू न देण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले.

एमआयएम नगरसेवक समर्थकांचा हैदोस, भाजप संघटनमंत्र्याची गाडी फोडली

‘भारतरत्न’ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे व आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असल्यामुळे आजच्या सभेत फक्त अटलजींना श्रद्धांजली अर्पण करु असा निर्णय घेण्यात आला. नगरसेवकांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते, एमआयएम नगरसेवकाची दर्पोक्ती

स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी ‘भारतरत्न’ अटलजींना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव मांडताच एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याने उठून आपला श्रद्धांजली वाहण्यास विरोध असल्याचे सांगत आरडाओरड सुरू केली. त्याने आपला विरोध नोंदवून घेण्याचा आग्रह धरताच शिवसेना-भाजपचे नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी सरळ मतीन याला घेरून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवणे सुरू केले. एकदम मारहाण सुरू होताच मतीन उंदरासारखा घाबरुन इकडे तिकडे पळू लागला. परंतु, नगरसेवकांनी त्याला चौफेर घेरलेले होते.