#AUSvIND ‘बेबीसिटिंग’साठी तयार, विरुच्या जाहिरातीने कांगारुंना झोंबल्या मिरच्या

9


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये कर्णधार टीम पेन आणि हिंदुस्थानचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा बेबीसिटिंग प्रसंग तुम्हाला आठवत असेल. पेनने पंतला त्याच्या मुलांना सांभाळण्याचा सल्ला दिला होता आणि तो त्याने पूर्णही केला होता. आता ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत असून त्यापूर्वी माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने बेबीसिटिंगचा एक असा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला नक्कीच मिरच्या झोंबणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थान दौऱ्यावर दोन टी-20 सामन्यांची मालिका आणि पाच एक दिवसीय मालिका खेळणार आहे. 24 फेब्रुवारीपासून याची सुरुवात होणार आहे. यापूर्वी विरूने सोशल मीडियाच्या माध्यमातून कांगारूंचे स्वागत केले आहे. आपण संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाचा सांभाळ करण्यास तयार असल्याची विरेंद्र सेहवागची सूचक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या व्हिडीओमध्ये विरू कांगारूंच्या संघाचा ड्रेसकोड घातलेल्या मुलांना कडेवर घेताना, त्यांचा सांभाळ करताना दिसत आहे.

विरूने या मालिकेच्या प्रसारणकर्त्यांसोबत एक व्यवसायिक जाहिरात चित्रित केली. यात विरू ऑस्ट्रेलियन चिमुरड्यांसोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये विरू मुलांना चुचकारताना दिसत आहे. ‘अले, अले, ले-ले बघा कोण आले आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलियान पटलन आली आहे’, असे म्हणत विरू आपण संपूर्ण संघाचे बेबीसिटिंग करण्यास तयार असल्याचे म्हणतो.

आपली प्रतिक्रिया द्या