धोनीचा धमाका..! सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा

16

सामना ऑनलाईन । मेलबर्न

धोनी संपला, धोनीने आता निवृत्ती घ्यावी असा सल्ला देणाऱ्यांना आणि टीका करणाऱ्यांना धोनीने आपल्या बॅटने उत्तर दिले आहे. नव्या वर्षातील धोनीचा धावांचा रतीब सुरूच असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम एक दिवसीय सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली. एक दिवसीय कारकीर्दीतील धोनीची ही 70 वी अर्धशतकीय खेळी ठरली.

#AUSvIND : रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थानचा विजय, मालिकाही जिंकली

धोनीने 2019 मध्ये सलग तिसरे अर्धशतक ठोकले आहे. या दरम्यान धोनीची बॅटिंग सरासरी 150 पार पोहोचली आहे. धोनीने सिडनीतील सामन्यात 51, पर्थमधील सामन्यात नाबाद 55 आणि मेलबर्नमधील सामन्यात नाबाद 87 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यात धोनीने एकूण 193 धावा केल्या. धोनीच्या तीनपैकी दोन अर्धशतकांवेळी टीम इंडियाने विजय मिळवला. याच कामगिरीच्या जोरावर धोनीने मालिकावीरचा पुरस्कार पटकावला.

धोनीने 2018 मध्ये खराब कामगिरी केल्याने त्याच्यावर टीकेचा वर्षाव होत होता. धोनीने गेल्या वर्षी 20 एक दिवसीय सामन्यात 275 धावा केल्या होत्या. यात त्याला एकदाही अर्धशतकीय मजल मारता आली नाही. परंतु ही कमी धोनीने नव्या वर्षात पहिल्या तीन सामन्यात सलग तीन अर्धशतक ठोकत पूर्ण केली.

आपली प्रतिक्रिया द्या