निर्णायक सामन्यासाठी झंपा आणि स्टॅनलेकचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश

1

सामना ऑनसाईन, मेलबर्न

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा एकदिवसीय सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात दोन बदल करण्याचं ठरवलं आहे. लेगस्पिनर अॅडम झंपा आणि वेगवान गोलंदाज बिली स्टॅनलेक यांचा ऑस्ट्रेलियाने संघात समावेश करण्याचं ठरवलं आहे. झंपाला संघामध्ये लायनऐवजी घेण्यात येणार आहे तर स्टॅनलेकला जेसन बेहरेनडॉर्फऐवजी संघात घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी म्हणजे १८ जानेवारीला हा सामना खेळवण्यात येणार आहे. या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकले आहेत. त्यामुळे मालिका विजयासाठी मेलबर्नचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. गेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलियाने एकही मालिका जिंकली नाहीये आणि हिंदुस्थानविरूद्ध अंतिम सामनाही ते जिंकू शकलेले नाहीयेत. या आकड्यांमुळे आणि मालिकेत हिंदुस्थानने साधलेल्या बरोबरीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दडपणाखाली आलेला आहे.