मेलबर्नमध्ये नाईट क्लबमध्ये गोळीबार; 1 ठार, 3 जखमी

18

सामना ऑनलाईन। मेलबर्न

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे असलेल्या एका नाईट क्लबमध्ये क्षुल्लक बाबीचे रूपांतर बाचाबाचीत झाले आणि त्यातूनच झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला असून अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाची आणखी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जखमी झालेल्या तिघांचे वय 29 ते 50 या गटातील आहे. मरण पावलेल्या चौथ्या इसमाचे वय लगेच कळू शकले नाही. या गोळीबारामागे घातपात असण्याची शक्यता मात्र पोलिसांनी साफ फेटाळून लावली. यामागे मोटरसायकल असलेल्या काही जणांच्या टोळक्याचा हात असल्याचे रविवारी सायंकाळी पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या