अशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा

सामना ऑनलाईन। मेलबॉर्न

वय वर्ष 44 , तीन मुलांची आई. पण 21 वर्षाच्या तरुणीलाही लाजवेल असे तिचे सौंदर्य. मादकता तर तिच्या चेहऱ्यावरच झळकते. रस्त्यावरून जाताना अनेक तरुणांच्या माना तिला बघण्यासाठी सतत मागे वळत असतात. ती आहे अबिनेल ओनिल. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील एक नामांकीत मॉडेल. वयाबरोबर महिलांच सौंदर्य फिकं पडतं. पण अबिनेलच्या बाबतीत मात्र असं अजिबात नाहीये. उलट वाढत्या वयाबरोबर तिच सौंदर्य अधिकच खुलतयं. हा चमत्कार डाएट किंवा व्यायाम करून झालेला नसून रोज 12 मिनिटं थंड व गरम पाण्याने अंघोळ केल्याने झाला आहे. असा दावा अबिनेलने केला आहे.

गेल्या 30 वर्षांपासून अबिनेल रोज 12 मिनिट अंघोळ करते. यातील 3 मिनिट ती गरम पाण्याने अंघोळ करते तर 30 सेकंद थंड पाण्याने अंघोळ करते. अशा पद्धतीने ती रोज तीनवेळा 3.30 मिनिटं अंघोळ करते. यामुळेच तिचा चेहरा व शरीर कायम तजेलदार दिसतं. कितीही थंडी असो वा उन्हाळा अबिनेलच्या अंघोळीच्या या क्रमात कधीही बदल होत नाही.

त्याचबरोबर दिवसाची सुरूवात ती लिंबू पाणी आणि हर्बल टीने करते. नाश्त्यामध्ये ती त्यात्या क्रुतुत मिळणारी फळं खाते. उकडलेली अंडीही तिला आवडतात. दुपारच्या जेवणातही ती हलका आहार घेते. रात्री मात्र ती सॅलेड किंवा सूप घेते.