विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर; स्मिथ-वॉर्नर परतले


सामना ऑनलाईन । सिडनी

मुंबईत सोमवारी होणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली.तिकडे वर्ल्ड कपचे जेतेपद राखण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही 15 खेळाडूंचा समावेश असणाऱ्या संघाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी घोषणा केली आहे.

इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने निवड केलेल्या संघातुन पीटर हॅंड्सकोम्ब आणि जोश हेझलवूड या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना डच्चू देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आल्यानंतर माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांचा कांगारूंच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ
अॅरॉन फिंच (कर्णधार),जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), नाथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स
उस्मान ख्वाजा, नाथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क
मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा