#AusvIndia ऑस्ट्रेलियाला 288 धावांवर रोखले, विजयाची हिंदुस्थानला उत्तम संधी


सामना ऑनलाईन, सिडनी

सिडनी इथे सुरू झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाच्या संघाला 288 धावांवर रोखले आहे. पीटर हँडसकोम्बने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक म्हणजे ७३ धावा केल्या.उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनीही अर्धशतके झळकावत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानी गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मनमोकळी फटकेबाजी करता आली नाही. हिंदुस्थानकडून भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. रवींद्र जाडेजा याने 10 षटकांमध्ये 48 धावा देत 1 विकेट मिळवली.