पब्लिशर सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1270 लेख 0 प्रतिक्रिया

मेष

व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. मुलांच्या तब्येतीची काळजी दूर होईल.

वृषभ

व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यावसायिक बाधा येऊ शकतात. आवकीहून खर्च अधिक असल्याने आर्थिक प्रश्नांना सामोरे जाल.

मिथुन

यात्रा घडू शकते. अडकलेला पैसे मिळतील. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिती चांगली राहील.

कर्क

संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.

सिंह

प्रयत्न अधिक पण अल्प लाभ अशी स्थिती आहे. तणाव अडचणी राहतील. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा. आर्थिक विवादातून नुकसान संभवते.

कन्या

कर्जापासून मुक्ती मिळेल. कामात मित्रांचं सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल.

तूळ

आपल्या मनमिळाऊ आणि धैर्यशील वृत्तीने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धी वाढेल.

वृश्चिक

प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. मुलांची उन्नती प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बिघडलेले संबंध सुधारतील.

धनु

जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. मित्रांच्या साहाय्याने अनुकूलता वाढेल. दिवस उत्तम जाईल.

मकर

महत्त्वपूर्ण कार्यांवर परिणाम होईल. लाभ प्राप्तीचा योग. व्यापारातील आर्थिक त्रासाला संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा.