इगतपुरीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

सामना प्रतिनिधी । नाशिक

इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारात रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये बुधवारी मध्यरात्री सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. बलायदुरी शिवारातील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट येथे रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा सुरू असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती इगतपुरी पोलिसांना दिली.

पुण्यातील एका कृषी कंपनीतील कर्मचाऱ्यांची ही रेव्ह पार्टी होती. पोलीस पथकाने छापा टाकला, तेव्हा या पार्टीत ९ तरुण व ७ तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळल्या. ९ पैकी एक मुलगा अल्पवयीन आहे.या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे