आझम खान पत्रकाराला चिडून म्हणाले, तुझ्या बापाच्या मयताला आलोय

34

सामना ऑनलाईन । विदिशा

अभिनेत्री आणि नेत्या जया प्रदा यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीक करणारे आझम खान यांची जीभ पुन्हा घसरली आहे. मध्य प्रदेशमध्ये एका पत्रकाराने जया प्रदावर केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला त्यावर ‘तुझ्या बापाच्या मयताला आलोय’ असे आझम खान म्हणाले. यावरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत.

समाजवादी पक्षाचे नेते आणि वाचाळवीर म्हणून कुप्रसिद्ध असणारे आझम खान यांनी भाजप उमेदवार जया प्रदा यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्यावर खूप मोठा गदारोळ निर्माण झाला. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. माजी राज्यसभा खासदार मुनव्वर सलीम यांचे मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये निधन झाले. तेव्हा श्रद्धांजली वाहण्यासाठी आझम खान गेले होते. पत्रकारांनी जया प्रदा यांच्यावर अश्लाघ्य भाषेवर केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला ‘आपके वालिद के मौत पे आया था’ (तुझ्या बापाच्या मयताला आलो होतो) असे रागाच्या भरात पत्रकाराला सुनावले. आता यावरूनही मोठा वाद होण्याची चिन्हे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या