….म्हणून मुसलमान ज्यादा मुलांना जन्माला घालतात: आझम खान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बादशहा (मोदी) जर काम दिलं असतं तर मुसलमानांनी इतक्या मुलांना जन्म दिला नसता. आमच्याकडे (मुसलमानांकडे) लोकसंख्या जास्त आणि काम कमी आहे, त्यामुळेच ते मुलांना जन्म देतात, असं वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलं आहे. त्यामुळे अन्य पक्षांनी त्यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली आहे.

आझम खान यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. २ वर्षात पंतप्रधानांनी ८० कोटी रुपयांचे कपडे घातले. ते स्वत:ला फकीर म्हणतात पण फकीर महाग कपडे वापरत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

एकदा आम्हाला केंद्रातली सत्ता द्या आम्ही २५-२५ लाख रुपये देऊ. एवढे पैसे दिल्यानंतर देखील हा देश ‘सोने की चिडिया’ राहिलच, असेही आझम खान म्हणाले.

माझ्या विधानांनंतर इतर पक्षातील लोक निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करतात. पण मी बोलत राहणार. मला कोणताही धोका नाही, मी बोलतच राहणार, मोदी सरकारने देशाला कंगाल केले, असेही आझम यावेळी म्हणाले.