‘ती’ने दिला उडत्या विमानात बाळाला जन्म

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जेट एअरवेजच्या विमानात एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. दमन ते कोची असा प्रवास सुरू असताना महिलेला प्रसूत वेदना सुरू झाल्याने विमानातील कर्माचाऱ्यांनी आणीबाणी घोषित करत विमान मुंबई विमानतळाकडे वळवले.

विमानात एकही डॉक्टर नसल्याने कर्मचाऱ्यांची चिंता वाढली, मात्र त्याच विमानाने एक नर्स प्रवास करत होती. नर्स आणि महिला कर्मचाऱ्यांनी विमानातच या महिलेची प्रसूती सुखरूप पार पाडली. महिलेने उडत्या विमानात गोंडस बाळाला जन्म दिला आहे. जेट एअरवेजचे हे विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर तातडीने आई आणि नवजात बाळाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.