सिंधू-सायना जेतेपदासाठी भिडणार

सामना ऑनलाईन । नागपूर

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि लंडन ऑलिम्पिकमधील कास्यपदक विजेती सायना नेहवाल या स्टार प्रतिस्पर्ध्यांमध्ये बुधवारी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकित किदांबी श्रीकांतसमोर झुंजार एच. एस. प्रणॉयचे कडवे आव्हान असेल. येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित सिंधूने पीएसपीबीच्या ऋत्त्विका शिवानी गाडेचा १७-२१, २१-१७, २१-११ ने पराभव केला. अन्य उपांत्य लढतींत द्वितीय मानांकित सायनाने एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अनुरा प्रभुदेसाईला १२-११, २१-१० ने सहज मात दिली.