जर हिंदुस्थानकडे राफेल असते तर बालाकोटचा निकाल अजून चांगला असता : वायुसेना

rafel-deal-Air Chief Marshal Dhanoa

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

जर देशाकडे राफेल विमाने असती तर बालाकोटवर केलेला हल्ला अधिक चांगला झाला असता असे वक्तव्य वायुसेनेचे प्रमुख बी एस धनोआ यांनी केले आहे. एका सेमिनार मध्ये ते बोलत होते.

धनोआ म्ह्णाले की, “बालाकोट अभियानावेळी हिंदुस्थानची तांत्रिक बाजू सक्षम होती. जर हिंदुस्थानकडे राफेल विमाने असती तर हा हल्ला अधिक चांगला झाला असता आणि त्याचा निकाल अजून चांगला मिळाला असता.’’ बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत झालेल्या चकमकीत आपण सुखरुप निघालो कारण आपण मिग-21 बायसन्स अआणि मिराज-2000 या विमानांचे अद्ययावतीकरणे केले होते, असेही धनोआ म्हणाले.

26 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानी वायुसेनेने पकिस्तान हद्दीतील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केले होते. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले, त्यात संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याची भावंडे आणि नातेवाईकांचाही समावेश होता.