अनोळखी माणसावरही मनापासून प्रेम करणारे बाळासाहेब

>>संतोष वैद्य

एक ऐतिहासिक छायाचित्र ज्यामध्ये ठाकरे परिवारासोबत गानसम्राज्ञी लतादीदी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत ते छायाचित्र साहेबांना भेट म्हणून देण्यासाठी मी आणि माझा भाऊ गेलो होतो. साहेबांची भेट होताच त्यांनी अगदी प्रेमाने त्यांनी आम्हाला बसायला सांगितले आणि आमची विचारपूस केली. त्यानंतर साहेबांनी त्यांचे स्वीय सचिव यांस चहा मागवायला सांगितले. दोन-तीन वाक्ये संभाषण झाल्यानंतर त्यांनी लगेच ओळखले असावे की आम्ही कोकणातले आहोत.

तशी खात्री करून घेतल्यावर दुसऱ्याच क्षणी त्यांनी सचिवांस पुन्हा बोलावले आणि सांगितले की “अरे, चहा नको यांच्यासाठी कोकम सरबत सांग.” त्यावेळी आम्हाला समोरच्या अनोळखी व्यक्तीला जाणणारे आणि त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करणारे साहेब अनुभवायला मिळाले. तेव्हा कळलं की, ज्या माणसाच्या नुसत्या नावानेच सारं जग थरथर कापतं, तोच माणूस कोकणातल्या फणसासारखा आहे. बाहेरून काटेरी, पण आतून अतिशय गोड. आमच्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय असा हा क्षण.

जय महाराष्ट्र!