शिवसेनाप्रमुखांच्या भव्य स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकासाठी 100 कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लवकरच शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक उभे राहणार आहे.

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वीच हे भव्य स्मारक महापौर बंगला परिसरात उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. पर्यावरण विभागासह सर्व विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतर या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी महापौर बंगल्याची जमीन स्मारक संस्थेला देण्यासाठी 10 जानेवारी रोजी मुंबई महापालिका आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाला. महापौर बंगल्याच्या परिसरातील जमिनीखाली हे स्मारक उभारले जाणार आहे.