निसर्गरम्य बाली

प्रतिनिधी

देवदेवतांच्या मंदिरांचा देखणा प्रदेश म्हणजे बाली. इंडोनेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात बालीने आपली हिंदू संस्कृती अबाधित ठेवली आहे. स्वप्नवत हजारच्या वर बेटांचा व हजारच्या वर हिंदू देवळांचा देखणा प्रदेश म्हणजे इंडोनेशियातील बाली. गंमत म्हणजे हे बेट पूर्णपणे हिंदू संस्कृती व लोकांनी व्यापले आहे… तेही एका मुस्लिम राष्ट्र इंडोनेशियामध्ये. अनेक आलिशान रिसॉर्ट, सुखावणारी भातशेतीची आगारे, संस्कृती आध्यात्मिक आहे. तसेच अतिथींना आदरयुक्त मैत्रीभाव देणारा प्रदेश. डेनपसार ही बालीची राजधानी व्यावसायिक व प्रशासकीय केंद्र आहे. विमानतळदेखील डेनपसारमध्येच आहे. कुठेही राहिलात तरी विमानतळ २५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

प्रत्येक घराच्या अंगणात वैयक्तिक देऊळ असतेच असते. देऊळ म्हणजे काय तर एक आखीव रेखीव दगडांचा ५ ते ६ फूट उंचीचा खांब, आपल्याकडील हेमाडपंथी देवळाच्या खांबासारखी. त्यावर कुठल्याही देवाची मूर्ती नसते. त्यावर देवाला, निसर्गाला रोज नैवेद्य ठेवतात. त्यात छोटेसे नारळाच्या कोवळय़ा पानांच्या झावळय़ाचे बनवलेले ताट असते. छोटय़ात छोटे १ इंच बाय १ इंचदेखील असते. त्यात थोडासा भात, त्यावर पिवळय़ा रंगाने माखलेला नारळाचा कीस, थोडी फुले इत्यादी असते. खांबाच्या वरच्या भागावर ठेवले जाते. ज्यांना परिस्थितीमुळे अशी मंदिरे बांधता येत नाहीत ती मंडळी चक्क रस्त्यावर असा नैवेद्य ठेवतात. फुटपाथवरदेखील. बऱयाचदा चालताना त्यावर पाय पडतो, अपशकून झाल्यासारखे वाटते, पण तेथील रहिवाशांशी बोलल्यावर कळले की, नकळत पाय पडला तर अपशकून होत नाही अशी आख्यायिका आहे.

भाषा…बॉलोनीज (किंचित संस्कृत शब्द) चलन ः इंडोनेशियन रुपिया १०० यूएसडी ङ १४ लाख रुपये.

प्रवास…मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता येथून विमाने आहेत, साधारण परतीचे तिकीट ३५ हजार रुपये. सीझनप्रमाणे कमी अधिक. हॉटेल्स ः बहुतांशी ४ स्टार, ५ स्टार, भाडे साधारण १० ते १२ हजार रु. रोज. जेवण .दोघांना बऱयापैकी ठिकाणी. भाडे ः साधारण ५०० ते ८०० रुपये. चहा वा कॉफी ः १ कप साधारण १५० हिंदुस्थानी रुपये.

काय काय पहावे?

कापीची (कॉफी) लागवड,  बाली ‘पाऊलिना’ येथे कॉफीच्या बिया उदमांजरसदृश छोटय़ा हिंसक प्राण्याला त्याच्या पिंजऱयामध्ये खाण्यासाठी ठेवतात. त्याची पचनसंस्था त्या बिया प्रक्रिया करून विष्ठsतून अखंड बी बाहेर पडते. मग त्या भाजतात व त्याची कापी (कॉफी) जगभर लोकप्रिय आहे. कॉफीच्या झाडांची लागवड डोंगराच्या उतारावर करतात, फार रमणीय दृश्य असते. अशा कॉफी इस्टेटला गाईडेड टुर्स असतात.

सेलुक हॅण्डिक्राफ्टला भेट द्या. जिथे बाटीक प्रिंटने तयार केलेले कपडे, चादरी अत्यंत माफक भावात मिळतात. उबुद आर्ट मार्केट, हस्तकलेच्या अनेक वस्तू बनवताना आपण बघू शकता तसेच विकतही घेऊ शकता.

तनाह लोट या परिसरात विलक्षण सूर्यास्त बघणे म्हणजे कॅमेरा व बघणाऱयाला सुख. झेन, नुसा दुआ या ठिकाणी माफक दरात विविध तेलांनी, स्क्रबनी मसाज करण्यास विसरू नका. नुसा पेनिडा परिसरातील मन्ता बे आणि क्रिस्टल बे येथे छान स्नॉर्कलिंग छोटा मास्क व नळीद्वारे श्वास घेऊन मन भरेपर्यंत समुद्रतळातील कोरल्स बघ.

केलिंगकिंग बीच

स्वप्नवत, निळय़ाशार समुद्र, नारळाच्या बागा व त्याच्या न रुळलेल्या किनाऱयावर संपूर्ण दिवस सावलीत पडून रहा.

गरुडाविसनु केनकाना

गरुडावर स्वार झालेल्या विष्णुदेवाची मूर्ती येथे तयार होत आहे. साधारण पूर्ण झाल्यावर संपूर्ण मूर्तीची उंची 15 माळय़ांच्या बिल्डिंगएवढी भव्य होणार आहे. खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे. ज्यात ऍम्फीथिएटर, रेस्टॉरंटस् प्रदर्शन, वॉक वेज, शॉपिंग सर्व काही आहे.

उलुवाटू मंदिर

भव्य रुद्र (महादेव) मंदिर विसावलेले आहे. त्याच्या सर्वात उंच भागावर दगडी बांधकाम केलेले पुरातन प्रेक्षागृह आहे. मावळणाऱया सूर्याच्या प्रकाशात रामायणावर दुर्मिळ नृत्यकलाकृती सादर होते. सीतेचे अपहरण, श्रीराम-रावण युद्ध इत्यादी प्रसंग समोर, तोंडाने काढलेल्या आवाजाच्या विशिष्ट स्वरांतून पार्श्वसंगीत उभे राहते.