पेन्शन हवी तर बँक खाते आणि मोबाईल क्रमांक अनिवार्य


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आता पेन्शनधारकांना त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि मोबाईल क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. नॅशनल पेन्शन योजनेच्या लाभार्थींसाठी या दोन्ही गोष्टी बंधनकारक असतील असे अर्थ मंत्रालयाने आज शुक्रवारी जाहीर केले. नॅशनल पेन्शन योजनेच्या सदस्यांना आणि नवीन सदस्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. पेन्शनधारकांना विविध योजनांचा लाभ सहज मिळावा, यासाठी हे अनिवार्य करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.