भाजपने बारामती जिंकली तर राजकारणातून निवृत्ती-अजित पवार यांचे आव्हान

2

सामना प्रतिनिधी। बारामती

बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपाने जिंकला तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ. भाजपवाल्यांना बारामती जिंकता आली नाही तर त्यांनी राजकारण सोडावे, असे आव्हान देत ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण मला वाटून काही उपयोग नाही. त्यासाठी विधानसभेला आघाडीच्या चांगल्या जागा आल्या पाहिजेत. जनतेने ठरवले तर ते होऊ शकते. मी पण मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करणार,’ असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

काटेवाडी (ता. बारामती) येथे पवार यांनी त्यांच्या मातोश्री आशा पवार, पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. बारामतीचा गड राष्ट्रवादीच राखणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामती जिंकणे सोपे नाही. केवळ मनोधैर्य वाढावे यासाठी भाजपाकडून बारामतीची 43 वी जागा जिंकू, अशी घोषणा करण्यात आली होती. मोदींची सभा झाली नाही तिथेच भाजपाचा पराभव निश्चित असल्याचे पवार यावेळी म्हणाले.