आराम करा अन् ताजेतवाने व्हा, विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला सरावातून सुट्टी

12
फोटो सौजन्य-बी.सी.सी.आय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

क्रिकेटविश्वातील सर्वोच्च मानली जाणारी विश्वचषक स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली असताना ‘टीम इंडिया’चे शिलेदार कुटुंबासह सहलीवर मौजमजा कशी करत आहेत? असा प्रश्न तमाम हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांना पडला असेल. मात्र ‘आयपीएल’ संपल्यानंतर क्रिकेटपटूंना लगेच सरावाला न जुंपण्याचा महत्त्वाचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला आहे. ‘तुम्ही सरावाऐवजी मनसोक्त आराम करा आणि ताजेतवाने व्हा’ असा सल्ला ‘बीसीसीआय’ने दिल्यामुळे बहुतांश खेळाडू आपापल्या कुटुंबीयांसह सहलीवर मौजमजा करत आहेत.

हिंदुस्थानी क्रिकेटपटू नुकतेच ‘आयपीएल’चा 12 वा हंगाम खेळून मोकळे झाले आहेत. आता 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी ‘टीम इंडिया’ची मोर्चेबांधणी करायची आहे. मात्र वर्षभर अतिक्रिकेटच्या ताणामुळे खेळाडूंना लगेच सरावाला जुंपण्यापेक्षा त्यांना शारीरिक व मानसिकदृष्टय़ा ताजेतवाने होण्यासाठी विश्रांतीची अधिक गरज असल्याने ‘बीसीसीआय’च्या संघव्यवस्थापनला वाटले. वर्षभरातील भरगच्च केळापत्रकाचा खेळाडूंच्या शरीराकर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचसोबत मोठय़ा कालाकधीपर्यंत खेळाडू आपल्या परिकारासोबत राहिलेले नसतात. अशा केळी आपल्या मित्रांसोबत-परिकारासोबत काही काळा घालविल्यानंतर त्यांच्याकरचा भार हलका होईल या उद्देशाने ‘बीसीसीआय’ने सरावापेक्षा खेळाडूंच्या आरामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंनी कुटुंबीयांसोबत वेळ घालवावा, फिरायला जावे आणि 21 मे रोजी मुंबईत ताजेतवाने होऊन परतावे असे खेळाडूंना सांगण्यात आले आहे.

यो-यो टेस्टही होणार नाही!
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेची ‘रन’धुमाळी संपल्यानंतर लगेच दहा दिवसांत विश्वचषक स्पर्धेसाठी ‘टीम इंडिया’त समावेश असलेल्या खेळाडूंची यो-यो टेस्ट घेणे ‘बीसीसीआय’च्या संघव्यवस्थापनाला योग्य वाटले नाही. कारण यो-यो टेस्टसाठी क्रिकेटपटू फ्रेश असणे गरजेचे असते. त्यामुळे वर्ल्ड कपसाठीच्या 15 खेळाडूंची यावेळी यो-यो टेस्ट होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या