बीसीसीआयची लष्कराला 20 कोटींची मदत

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

 हिंदुस्थानी क्रिकेटची राष्ट्रीय संघटना बीसीसीआयने यंदा आयपीएलच्या उद्घाटन सोहळय़ाला कात्री लावत लष्कराला 20 कोटींची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयकडून शनिवारी चेन्नईत झालेल्या उद्घाटन सोहळय़ात ही मदत करण्यात आली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी बीसीसीआयकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बीसीसीआयकडून 11 कोटी आर्मीला, सात कोटी सीआरपीएफला आणि नेव्ही व एअरफोर्सला प्रत्येकी एक कोटी यावेळी देण्यात आले.