आदित्यनाथांमुळे बीसीसीआय अडचणीत, एका रात्रीत स्टेडियमचे नाव बदलले

1

सामना ऑनलाईन । लखनौ, दि. 6 (वृत्तसंस्था)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे बीसीसीआय अडचणीत सापडली. उत्तर प्रदेश सरकारने एका रात्रीत लखनौ येथील क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलले. आता हे स्टेडियम ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना’ या नावाने ओळखले जाईल. दोन देशांच्या मालिकेतील सामना जाहीर करण्यात आल्यानंतर तसेच तिकीट विक्री झाल्यानंतर स्टेडियमचे नाव बदलण्याची इतिहासातील पहिलीच घटना ठरलीय, मात्र यामुळे बीसीसीआयला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

स्टेडियममध्ये लावलेले जुने होर्डिंग्ज बीसीसीआयला झटपट बदलावे लागले. तसेच क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकात आता ‘एकाना’ ऐवजी ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी’ या नावाचा उल्लेख करावा लागणार आहे. प्रायोजकांनाही कागदपत्रांमध्ये बदल करावा लागणार आहे. एकूणच काय, तर उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाचा फटका यावेळी बीसीसीआयला बसला आहे.