करणची कॉफी महागात पडली, के.एल.राहुल आणि पांड्याला 20 लाखांचा दंड

1

सामना ऑनलाईन, मुंबई

क्रिकेटपटू के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या या दोघांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. या दोघांना निमलष्करी दलाच्या 10 शहीद जवानांच्या  कुटुंबांना मदत म्हणून प्रत्येकी 1 लाख रूपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय अंध क्रिकेटपटूंच्या असोसिएशनला 10 लाखांची रक्कम देण्याचेही आदेश दिले आहेत. ही रक्कम जमा करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली असून जर ही रक्कम जमा करण्यात आली नाही तर ती त्यांच्या मॅच फीमधून कापून घेण्यात येणार आहे. कॉफी विथ करणमध्ये महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे