क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी नको

विजयनगरम (१९३६) – ३ सामने

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नॅशनल ऍण्टीं-डोपिंग एजन्सीने (नाडा) केलेली क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टची मागणी बीसीसीआयने फेटाळून लावली आहे. ‘नाडा’ या सरकारी संस्थेच्या अधिकार क्षेत्राखाली क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट येत नसल्याचे कारण बीसीसीआयने यावेळी दिले आहे.

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ‘नाडा’चे मुख्य अधिकारी नवीन अग्रवाल यांना पत्र लिहून स्पष्ट केले आहे की, बीसीसीआय राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा भाग नसल्याने ‘नाडा’ क्रिकेटपटूंची डोप टेस्ट करू शकत नाही. बीसीसीआयची सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा त्यासाठी सक्षम आहे. जोहरी पुढे म्हणाले, क्रिकेटपटूच्या नमुन्यांची चाचणी ‘वाडा’च्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्रयोगशाळेत होत असते.