‘क्रिकेट कुंभमेळा’ ५ एप्रिलपासून

मुंबई – अवघ्या क्रिकेट जगताचे आकर्षण ठरलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या हंगामाचे वेळापत्रक आज हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घोषित केले. क्रिकेटच्या या कुंभमेळय़ाची सुरुवात येत्या ५ एप्रिलला हैदराबादमध्ये होणार असून समारोप २१ मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. टी-२० फॉर्मेटची ही स्पर्धा एकूण ४७ दिवस रंगणार आहे. त्यात जगभरातल्या नामवंत क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांना मिळणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रायझिंग पुणे सुपरजाएंटस्, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे आठ संघ या लीगमध्ये प्रत्येकी १४ सामने खेळतील. त्यातील ७ लढती त्या त्या संघांच्या होम ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहेत. २०११ नंतर प्रथमच यंदा इंदूरला आयपीएल लढतींचे यजमानपद बोर्डाने दिले आहे. आयपीएलच्या ४७ लढती १० वेगवेगळय़ा मैदानात खेळवल्या जाणार आहेत. ‘आयपीएल १०’साठी क्रिकेटपटूंचा लिलाव सोमवार २० फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे.

आयपीएल-१०चे वेळापत्रक
५ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (हैदराबाद, रात्री ८ वाजता)
६ एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे, रात्री ८ वाजता)
७ एप्रिल : गुजरात लायन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स (राजकोट, रात्री ८ वाजता)
८ एप्रिल : किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपर जायंट्स (इंदूर, दुपारी ४ वाजता)
८ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरू, रात्री ८ वाजता)
९ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात लायन्स (हैदराबाद, दुपारी ४ वाजता)
९ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स (मुंबई, रात्री ८ वाजता)
१० एप्रिल : किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (इंदूर, रात्री ८ वाजता)
११ एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (पुणे, रात्री ८ वाजता)
१२ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, रात्री ८ वाजता)
१३ एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (कोलकाता, रात्री ८ वाजता)
१४ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स (बंगळुरू, दुपारी ४ वाजता)
१४ एप्रिल : गुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (राजकोट, रात्री ८ वाजता)
१५ एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता, दुपारी ४ वाजता)
१५ एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (दिल्ली, रात्री ८ वाजता)
१६ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. गुजरात लायन्स (मुंबई, दुपारी ४ वाजता)
१६ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (बंगळुरू, रात्री ८ वाजता)
१७ एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स (दिल्ली, दुपारी ४ वाजता)
१७ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (हैदराबाद, रात्री ८ वाजता)
१८ एप्रिल : गुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (राजकोट, रात्री ८ वाजता)
१८ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (हैदराबाद, रात्री ८ वाजता)
२० एप्रिल : किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स (इंदूर, रात्री ८ वाजता)
२१ एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्स वि. गुजरात लायन्स (कोलकाता, रात्री ८ वाजता)
२२ एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली, दुपारी ४ वाजता)
२२ एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद (पुणे, रात्री ८ वाजता)
२३ एप्रिल : गुजरात लायन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (राजकोट, दुपारी ४ वाजता)