शिक्षणाच्या व्यवस्थेवर ‘बे एके बे’

सामना प्रतिनिधी । मुंबई

लवकरच प्रदर्शित होणारा ‘बे एके बे’ हा मराठी सिनेमा शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा असून समाजातील सत्य परिस्थिती मांडणारा आहे. निर्माते विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव यांनी थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या बेनरखाली ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती केली आहे.

हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते असून प्रविण गरजे आणि चिंतामणी हे सहनिर्माते आहेत. यात संजय खापरे, जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या भूमिका पाहायला मिळतील.