अस्वल गावात घुसलं, गावकऱ्यांची पळापळ

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड भागात सकाळी सकाळी अस्वल घुसल्याने एकच धावपळ उडाली. हा दाट लोकवस्तीचा परिसर असून याच भागातील मैदानात असलेल्या पडक्या घरात अस्वल लपून बसलं होतं.

या भागात झाडीझुडपे असल्याने अस्वल सुरुवातील कोणाला दिसलं नाही. मात्र काहींना हे अस्वल दिसताच त्याची बातमी गावभर पसरली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अस्वलाला भूलीचे इंजेक्शन देऊन पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.