सुंदर चेहरा

बाजारात अनेक प्रकारचे महागडे फेस मास्क उपलब्ध आहेत, मात्र घरी तयार केलेले फेस मास्कही चिरतरुण राहण्यासाठी मदत करतात.

> २ चमचे लिंबाचा रस, अंडय़ातील पांढरा भाग एकत्र करून चेहऱयाला लावावा.

> १ चमचा खोबरेल तेल आणि पाव चमचा हळद घेऊन तयार केलेला फेस मास्कमुळे चेहऱयाची त्वचा निरोगी राहते.

> १ चमचा लिंबाचा रस, २ चमचे मध त्वचा तुकतुकीत आणि चमकदार बनवते.

> रंग उजळण्यासाठी २ चमचे लिंबाचा रस, २ चमचे दही मिसळून तयार केलेला फेस मास्क वापरावा.

> १ चमचा दालचिनी आणि २चमचे मधापासून बनवलेला फेस मास्क वापरल्याने चेहऱयावरील पुरळ नष्ट होतात.