बीडमध्ये तिहेरी अपघातात कार पेटली; महिलेचा भाजून मृत्यू

137

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जवळील कोलवाडी येथे संभाजीनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारी टाटा सुमो, कार आणि एका वाहनाचा तिहेरी अपघात झाला. या अपघातानंतर कारने अचानक पेट घेतला आणि जळून खाक झाली. या कारमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांपैकी एक महिला गाडीत अडकल्याने जळाल्याची माहिती आहे तर दुसरी महिला जखमी झाली आहे. तिला गावकऱ्यांनी गाडी जळत असताना शिताफीने बाहेर काढले. या जखमी महिलेला बीडच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

या गाडीत ज्ञानेश्वर जाधव (40), पत्नी मनीषा (35) मुलगी लावण्या (14) असे तिघे जण प्रवास करत होते. पुण्याहून परतत असताना ज्ञानेश्वर जाधव स्वत: कार चालवत होते. कोलवाडी येथे हा अपघात झाला. मनीषा जाधव यांचा घटनास्थळीच मृत्य झाला. दरम्यान, जाधव आणि त्यांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या