राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदी अशोक डक बिनविरोध

सामना ऑनलाईन । माजलगाव, बीड

महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालकपदासाठी बीड, धाराशिव मतदारसंघातुन येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची आज बिनविरोध संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

राज्य बाजार समिती संघामध्ये येत्या २३ मार्च रोजी एकूण २१ संचालक पदासाठी ही निवडणुक होत आहे. बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून सर्वसाधारण गटातून धाराशिव येथून अच्यूतराव जनार्दन साठे अॅड. प्रकाश नामदेव मोटे हे दोन अर्ज तर बीडमधून माजलगांव बाजार समितीचे सभापती अशोक गोविंदराव डक असे तिन अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी  मोटे व साठे यांनी अर्ज मागे घेतल्याने अशोक डक यांचा एकमेव अर्ज राहिला असल्याने संचालकपदी डक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राजकीय दृष्ट्या या संघावर सर्व पक्षीय वर्चस्व आहे. या संघाच्या अध्यक्षपदासाठी अशोक डक यांचे नाव आघाडीवर आहे. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्वादी काॅंग्रेस पक्ष वाढीसाठी जिल्हाध्यक्ष म्हणून डक यांनी मोठे योगदान दिले असून त्यावेळी जिल्हा परिषद सत्तांतरामध्ये देखिल त्यांची भूमीका महत्वाची होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी डक यांची जवळीकता असल्याने त्यांचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही