धारूरच्या घाटात ट्रॅव्हल्स पलटली, एक ठार 21 प्रवासी जखमी

99

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यातील धारूर घाटात उदगीर हुन संभाजीनगर कडे जाणारी हमसफर ट्रॅव्हल्स ( गाडी क्र.-एम.एच 20-डबल्यु-9906) पलटी होऊन झालेल्या
अपघातात एक महिला ठार झाली असून 21 जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री दोनच्या सुमारास घडली.

या बसमध्ये एकूण 36 प्रवासी (चालक, क्लिनर सह) होते. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्योती नावाच्या (60) महिलेचा अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतरांवर उपचार सुरू असून 16 जणांना घरी पाठविण्यात आले आहे .

आपली प्रतिक्रिया द्या