1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडचा संघ सध्या सर्वोच्च फॉर्मात खेळताना दिसत आहे. आगामी वन डे विश्वचषक यंदा इंग्लंडच्या धरतीवर होत आहे आणि इंग्लंडला विश्वचषकाचा प्रमुख दावेदार मानले जात आहे. सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात एक दिवसीय सामन्यांच्या मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला, तर दुसरा सामना विंडीजने आपल्या नावावर केला. परंतु या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला.

दुसऱ्या सामन्यात बेन स्टोक्सने एक नो बॉल फेकून नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. तब्बल दोन वर्ष आणि जवळपास 1800 षटकानंतर इंग्लंडच्या गोलंदाजाने लाईनच्या पुढे पाऊल टाकत नो बॉल फेकला आहे. हा सर्व प्रकार विंडीजच्या डावातील 48 व्या षटकात घडला. विशेष म्हणजे एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने 11 हजार चेंडूनंतर लाईनच्या पुढे पाऊल गेल्याने नो बॉल फेकल्याचा विक्रम झाला आहे.

दरम्यान, दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात विंडीजे हेटमायरच्या दणदणीत शतकाच्या आणि गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडला 290 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 263 धावांमध्ये गारद झाला आणि विंडीजने हा सामना 26 धावांनी जिंकला. या विजयासह विंडीजने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.