नेहरू सेंटरमध्ये ‘बेनकाब’

अवनी आर्ट्स प्रा. लि. या बॅनरअंतर्गत अमी त्रिवेदी, चेतन गांधी यांची निर्मिती असलेल्या ‘बेनकाब’ या हिंदी नाटकाचा प्रयोग येत्या रविवारी 2 सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजता वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये होणार आहे. किरण मालवणकर आणि चित्रक शहा यांची प्रस्तुती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन निमेश दिलीपराय यांनी केलंय. पैशामुळे प्रतिष्ठा विकत घेता येते. मोठे घर, महागडय़ा मोटारगाडय़ा आणि शक्ती विकत घेता येते. पण पैशाद्वारे प्रेम, कुटुंब, कुटुंबीयांचा आनंद विकत घेता येतो का? खूप श्रीमंत असलेले कुटुंबीय खरोखरच खूप आनंदात असतात का? नेमक्या याच विषयावर ‘बेनकाब’ या नाटकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या नाटकात अमी त्रिवेदी, निमेश दिलीपराय, सुनील शहा, पिंकी जैन, चिंतन मेहता, योगिनी व्यास, खूस गणात्रा, प्रमित बारोट वगैरेंच्या भूमिका पाहायला मिळतील.