अंतराळातही आहे एक बर्म्युडा ट्रायंगल

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

अटलांटिक महासागरातल्या बर्म्युडा ट्रायंगलची दहशत जगभर आजही कायम आहे. या भागात आजवर शेकडो विमाने आणि मोठी जहाजे बेपत्ता झाली आहे. या बर्म्युडा ट्रायंगल रहस्याचा शोध जगभरातल्या वैज्ञानिकांकडून घेतला जातो. याबाबत अनेक प्रकारचे संशोधनही उपलब्ध आहे. तरीही सामान्यांच्या मनामध्ये या भागाचे गुढ आणि दहशत कायम आहे. या काळजीमध्ये भर पाडणारी बातमी अंतराळातून आली आहे. अटलांटिक महासागराप्रमाणेच अंतराळामध्येही एक बर्म्युडा ट्रायगंल आहे.

अंतराळातल्या या बर्म्युडा ट्रायंगलजवळून जाताना विचित्र अनुभव आल्याचे अंतराळवीर सांगत आहेत. प्रामुख्याने या भागातून जाताना अंतराळयानातील संगणकामध्ये अचानक बिघाड होतो. यानाच्या रचनेवरही त्याचा परिणाम होतो. अवकाशात अचानक भयंकर प्रखर उजेड पसरतो. जो साध्या डोळ्यांनी पाहणं जवळंजवळं अशक्य असल्याचं नासाच्या अंतराळवीर टेरी वर्टस यांनी म्हटले आहे. टेरी यांनी दोनवेळा अंतराळ मोहिमेत सहभाग घेतला असून दोन्हीवेळा त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना अंतराळात सारखाच अनुभव आल्याचं त्यांनी सांगितले.

अभ्यासादरम्यान अंतराळात बर्म्युडा ट्रायंगल असल्याचे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्ष अनुभव मात्र थरारक होता असेही टेरी यांनी सांगितले आहे. अंतराळवीर या भागाला दक्षिण अटलांटीक एनोमली म्हणतात. या भागातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी अंतराळयानाचा वेगही वाढवला जातो.पण असे असले तरी या भागातून जाणाऱ्या उपग्रहांना मात्र रेडिएशनचा हल्ला झेलावा लागत असल्याचं टेरी म्हणाल्या आहेत.