निर्मळ मैत्री…

ललित प्रभाकर

तुझी मैत्रीण.. हेमलता (माझी आई) सर्वात जास्त काळ तिच्याशीच माझी मैत्री आहे.

तिच्यातली सकारात्मक गोष्ट..तिच्यात शिकण्याची चिकाटी, जिद्द आहे. स्वयंपाक चांगला करते.

तिच्यातली खटकणारी गोष्ट..ती माझी फार काळजी करते, मला ओरडते. म्हणून मी माझी फार काळजी घेत नाही.

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..जेव्हा मी तिला म्हणालो की, मला शिक्षण सोडून या क्षेत्रात काम करायचंय. तेव्हा तिने मला पाठिंबा दिला.

तिच्याकडून काय शिकलास?..शिकण्यासाठी जिद्द महत्त्वाची आहे हे तिच्याकडून शिकलो.

तिचा आवडता पदार्थ..सगळे शाकाहारी पदार्थ आणि आईस्क्रीम खूप आवडतं.

ती निराश असते तेव्हा..मी आणि माझा भाऊ तिला हसवतो.

एकमेकांसाठी वेळ देता का ?..जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ देतो. ती शिक्षिका आहे. त्यामुळे तीही बिझी असते.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण..घरी.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण..‘चि. आणि चि.सौ.कां.’च्या प्रीमियर शोला मी तिला घेऊन गेलो तेव्हा तिला फार बरं वाटलं.

तू चुकतोस तेव्हा ती काय करते?..ती मला ओरडते. खूप ओरडते. मी निमूट ऐकतो.

भांडण झाल्यावर काय करता?…चिडचिड झाल्यावर सगळं शांत झाल्यावर तीच माझ्याशी बोलायला येते.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो?..मला.

तुमची एखादी तिला आवडणारी सवय..तिला नेहमी असे वाटत असते की, मी माझी काळजी घेत नाही.

तुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या ?…खरी मैत्री ही नेहमी पारदर्शक असते.

एकत्र पाहिलेला सिनेमा? ‘चि. व चि.सौ.कां’

एकत्र फिरायला जायचे ठिकाण ? ठरावीक ठिकाण नाही, कुठेही फिरायला जायला आवडतं.

तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली ?..आपल्या आईशी मैत्री करायला कोणाला आवडणार नाही ?