मित्र

प्राजक्ता माळी

तुझा मित्र..विकास पाटील

निसर्ग सान्निध्यात जावसं वाटतं का?..हो, खूप आवडतं. श्रावणात निसर्ग बहरलेला असल्यामुळे पुणे-मुंबई प्रवास छान होतो.

श्रावणात खाण्या-पिण्याच्या मर्यादा पाळता का?..हो, गरम पाणी पिते. बाहेर खाणं टाळतो. तेलकट खात नाही.

 श्रावण हा निसर्गऋतू म्हणून अनुभवण्यास आवडतो की खाद्यऋतू म्हणून आवडतो?.. डाएट करावं लागत असल्यामुळे निसर्गाचा आनंद घेतो.

मैत्री आणि पाऊस यावर काय सांगशील?..दोन्ही जिव्हाळ्याचे आहेत. दोन्हीची तुलना नाही होऊ शकत.

 त्याच्यातली सकारात्मक गोष्ट.. खूप सकारात्मक आहे. वाईट गोष्ट घडली तरी त्यात सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा याची तुम्हाला जाणीव करून देईल.

त्याच्यातली खटकणारी गोष्ट..जास्तच चिडतो.

 त्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट..सुवासिनी मालिका करत असताना तो माझा सहकलाकार होता. त्यावेळी तो ओशोंची पुस्तके वाचत होता. ती पुस्तके त्याने मला वाचायला दिली. आयुष्य बदलायला त्या पुस्तकांनी मला मदत केली. तीच सगळ्यात सुंदर भेट.

त्याच्याकडून काय शिकलात?..शांतपणे विचार करून उत्तर देणे, वागण्या-बोलण्याची लकब कशी असावी, हे शिकले.

 त्याचा आवडता पदार्थ..त्याला सगळंच खायला आवडतं.

तो निराश असते तेव्हा..शांत बसतो. काही बोलत नाही. आनंदी असतानाच फोन करतो. ध्यानधारणा करतो.

एकमेकांसाठी वेळ देता का?..भेटायला जमत नाही. फोनद्वारे एकमेकांच्या संपर्कात असतो.

 दोघांचे भेटण्याचे ठिकाण..माझ्या घरी किंवा सेटवर.

 त्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण…एकदा मी कमालीची निराश होते. तेव्हा त्याने अर्धा तास माझं ब्रेन वॉश केलं. म्हणून मी त्यातून बाहेर पडू शकले.

तू चुकतेस तेव्हा तो काय करतो?..समजावतो.

भांडण झाल्यावर काय करता?..टोकाची भांडणं होत नाही. मी चिडचिड करते.

त्याचं वर्णन..मी त्याला कृष्ण म्हणते. लांब राहून मदत करणं, संपर्कात राहणं त्याला जमतं.

तुझी एखादी त्याला न आवडणारी सवय..मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्याला असं वाटत की, जे पटत नाही त्याविषयी भाष्य करू नये.

तुला तो कसा हसवतो?..आधी तो ब्रेन वॉश करतो. नंतर हलकेफुलके विनोद करून हसवतो.

 एकत्र पाहिलेला सिनेमा?..उडता पंजाब, सैराट, अर्थ, मंडी

एकत्र भेटण्याचं ठिकाण?..ठिकाण ठरलेलं नाही. भेटणं आणि संवाद महत्त्वाचा आहे. भेटी कमी होतात.

त्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली? ः वाटली नाही. आपोआप झाली. विचार पटले की मैत्री होतेच.