मित्र

अनिता दाते

ते तिघं

 तुझा मित्रसागर कारंडे, उमेश जगताप, सुहास शिरसाट

  त्यांच्यातली सकारात्मक गोष्टहे तीघेही जण खूप चांगले कलाकार आहेत. नाटक करताना त्यांच्यात अत्यंत जिवंतपणा असतो. त्यांना रंगमंचावर  बघायला मला खूप आवडतं. या गुणामुळे आमची मैत्री आहे.

 त्यांच्यातली खटकणारी गोष्टकामात असले की, कोणालाच वेळ देत नाहीत. त्यामुळे बऱयाचदा विनाकारण भेट होत नाही. कामाच्या वेळेतच ते भेटू शकतात.

त्यांच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेटभेटी देणं-घेणं असं काही आमच्यामध्ये नसतंच, पण तरीही हॉस्टेलला असताना सुहासने माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यासाठी शर्ट आणला होता.

त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं ?- सतत शिकायला मिळतं, सल्ले मिळतात. त्यांच्याबरोबर रहावसं वाटतं म्हणूनच त्यांच्याशी माझी मैत्री आहे.

त्यांचा आवडता पदार्थचहा

ते निराश असतात तेव्हा फोन करून काय करावं आणि काय करू नये, याविषयी सांगतात. त्यावेळी आम्ही एकमेकांना भेटतो. चर्चा करतो.

तुमचे भेटण्याचे ठिकाण –  शक्यतो नाटय़गृहाच्या जवळ आणि जिथे चहा मिळतो अशा ठिकाणी कुठेही भेटतो.

त्यांच्यासोबतचा अविस्मरणीय क्षणसुहास आणि उमेश हो दोघे माझे शाळेतले मित्र आहेत. त्या दोघांबरोबर मी ‘वेडा कुंभार’ हे नाटक करत होते. त्यावेळी आमचा नाटकाचा एक प्रयोग खूप छान झाला होता. तो प्रयोग आम्ही कधीही विसरू शकणार नाही. त्या प्रयोगाच्या आठवणी आजही आम्ही काढतो.

 तू चुकतेस तेव्हा ते काय करतात मी कुठे चुकले आहे हे ते स्पष्टपणे सांगतात. कसं सांगायचं, काय वाटेल वगैरे असा विचार करत नाहीत.

भांडण झाल्यावर काय करता ?- एकमेकांना खूप बोलतो.

 जास्त राग कोणाला येतो ? – मी जास्त चिडते. ते सगळेजण समजून घेणारे आहेत.

त्यांचं वर्णन – नाटकाप्रतीचं डेडिकेशन हा तिघांमधला समान धागा आहे. ते कधीही वेळेच्या बाबतीत चुकत नाहीत. कामासाठी प्रचंड मेहनत आवडतात.

तुझी एखादी त्यांना आवडणारी सवयमी स्पष्ट बोलते किंवा पटकन चिडते.

तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या ?- अडीअडचणी, सुख-दुःखाच्या क्षणी एकमेकांच्या सोबत असणं आणि एकमेकांना ओळखून असणं.

तुला ते कसे हसवतात ? – ते असे काहीही प्रयत्न करत नाहीत. पण त्यांचं सोबत असणं हेच खूप असतं. आपण जेव्हा निराश असतो तेव्हा आपल्याला त्यातून कोणीही बाहेर काढू शकत नाही.