मैत्रीण

आनंदा कारेकर

समंजस…सकारात्मक…

तुमची मैत्रीण –  नम्रता गायकवाड

तिच्यातली सकारात्मक गोष्ट मला तिचं खूप सकारात्मक असणं भावलं.

तिच्यातली खटकणारी गोष्ट तिला पाठवलेल्या मेसेजला ती पटकन रिप्लाय देत नाही.

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट एकदा ती शुटिंगनिमित्त बाहेर गेली होती. तिथून तिने माझ्यासाठी खूप छान गणपतीची मूर्ती आणली होती.

तिच्याकडून काय शिकलात ?- सतत सकारात्मक राहणं, कोणत्याही प्रसंगाचं खूप वर्णन करून सांगयचं, अशी मला सवय होती. त्याऐवजी ‘टू द पॉईंट’ कसं बोलायचं हे तिने मला शिकवलं.

तिचा आवडता पदार्थ चिकन

एकमेकांसाठी वेळ देता का ? – हो, कधी कधी ठरवून वेळ काढून आम्ही एकमेकांच्या घरी भेटतो.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण ठराविक नाही, पण वेळेनुसार आणि सोयीनुसार कुठेही भेटतो. ती ज्या ठिकाणी राहते. त्या ठिकाणी मला भेटायला आवडतं.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण  एकदा असा प्रसंग घडला की, आम्ही एका ठिकाणी शुटिंगला गेलो होतो. तिथे शेजारी एक उपहारगृह होतं. तिथे आम्ही ऑर्डर दिल्यावर मला शॉटसाठी बोलवलं. शॉट देऊन येण्यासाठी मला दीड तास वेळ लागला. तोपर्यंत ती माझी वाट बघत तिथेच थांबली होती.

तुम्ही चुकता तेव्हा ती काय करते मला लगेचच सांगते.

भांडण झाल्यावर काय करता ?- भांडतो आणि नंतर लगेचच बोलतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ? – तिला.

तिचं वर्णन – दिवसभरात जे करायचं ठरवते ते ती करतेच. लवकर उठणे, वगैरे त्याप्रमाणे ती वागते.

तुमची एखादी तिला न आवडणारी सवय माझी एखादी गोष्ट किंवा घटना खूप पाल्हाळ लावून सांगण्याची सवय तिला आवडत नाही.

तुमच्या दृष्टिने मैत्रीची व्याख्या ?- सुखात आणि दुःखात मैत्री एकमेकांबरोबर असते. रक्ताची नात्यांपेक्षा मैत्रीची नाती जोडली जातात.

निराश असताना ती तुम्हाला कशी हसवते ? – निराशेतून बाहेर येण्यासाठी आम्ही एकमेकांना मार्गदर्शन करून मदत करतो.

एकत्र पाहिलेला नाटक/ सिनेमा ? – जय गंगाजल

एकत्र फिरायला जायचे ठिकाण ? – ठराविक नाही.

तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली ? – मला तिचा स्वभाव आवडला. ती को-ऑपरेटिव्ह वाटली.