मैत्रीण

पूजा घाटकर,नेमबाज

माझी पहिली सखी

 तुमची मैत्रिण…भारती घाटकर (माझी आई)

तिच्यातली सकारात्मक गोष्ट…प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार कसा करायचा हे ती सांगते.

 तिच्यातली खटकणारी गोष्ट… तिच्यातलं मला काहीच खटकत नाही.

दिवाळीनिमित्त तिच्याकडून मिळालेली सुंदर भेट..बऱयाचदा दिवाळी साजरी करायला मी घरी नसते. तेव्हा ती बाहेरगावाहून आल्यानंतर माझ्यासाठी दिवाळीचे पदार्थ तयार ठेवते.

तिच्याकडून काय शिकलात?…सदैव दुसऱयांना मदत करत राहावी. त्याकरिता त्या व्यक्तिचा स्तर पाहू नये. आपल्या क्षमतेनुसार इतरांना त्यांच्या संकटात मदत करण्याकरिता सहभागी व्हावे.

दिवाळीच्या फराळातला तिचा आवडता पदार्थ…चकली, करंजी

ती निराश असते तेव्हा..माझ्याशी बोलते. अशा वेळी आम्ही खरेदीला बाहेर जातो. ती स्वतः खूप सकारात्मक असल्यामुळे तिच्या निराशेवर ती मात करते.

एकमेकांसाठी वेळ देता का?..हो एकमेकांना माझ्या खेळाच्या सराव आणि स्पर्धेतून जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ देतोच.

 दिवाळीच्या सुटीत फिरायला जाण्याचं आवडतं ठिकाण…नेमबाजीचा सराव आणि स्पर्धा खूप असल्यामुळे फिरायला जायला जमतच नाही. यंदाच्या दिवाळीतही मी दिल्लीला स्पर्धेनिमित्त जात आहे. म्हणून दिवाळीला मी घरी नाही याचं मला वाईट वाटू नये म्हणून ती दिवाळीच्या दिवसांत माझ्यासाठी दिल्लीला येणार आहे.

 तिच्यासोबतच साजरी केलेली अविस्मरणीय दिवाळी…जेव्हा मी दिवाळसणाला घरी असेन तेव्हा आम्ही हाच प्रयत्न करतो की, सगळ्यांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी करायची. कारण प्रत्येक दिवाळीला मी घरी असतेच असं नाही.

तुम्ही चुकता तेव्हा ती काय करते…अशावेळी ती मला समजून सांगते. कधी कधी ओरडतेसुद्धा. काय करायला हवं, काय नको हा मार्ग आई मला दाखवते.

भांडण झाल्यावर काय करता..भांडण कधी होत नाही, पण झालं तरी आम्ही दोन मिनिटांत लगेच एकत्र येतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ?…मला खूप राग येतो. तेव्हा ती मला खूप समजून घेते.

तुमची एखादी तिला न आवडणारी सवय…मला खूप राग येतो हे तिला आवडत नाही. तीचं म्हणणं असतं मी नेहमी शांत राहावं. माझ्या खेळातही याचा उपयोग होईल.

तुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या?…कामापुरती मैत्री न करता ज्याच्याशी आपण मैत्री करतो त्याला कोणत्याही परिस्थितीत पुरेपूर साथ द्यावी. निखळ मैत्री करावी.

तुम्हाला कशी हसवते ?…घरी एकत्र सिनेमा बघतो, बाहेर फिरायला जातो किंवा कॉमेडी शो बघतो. जेणेकरून माझा ताण निघून जाईल आणि मी काहीतरी वेगळा विचार करेन.

 तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली ?…लहानपणापासून आईला बघत आलेय. तिच्याकडून खूप काही शिकलेय. जे काही जीवनात घडतं त्यावर ती मला जो काही सल्ला देते तो माझ्यासाठी योग्यच असतो. त्यामुळे मला अशी आई मिळाली की जी माझी पहिली मैत्रीण आहे.