पारदर्शक…. सकारात्मक…

राहुल मेहंदळे

तुमची मैत्रीण… –  श्वेता मेहेंदळे

तिच्यातली सकारात्मक गोष्ट – माझे आर्थिक व्यवहार ती बघते. कारण त्याचा मला प्रचंड ताण येतो. माझ्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून दरवेळी मला सकारात्मक ऊर्जा देते.

तिच्यातली खटकणारी गोष्ट- ती मला फारच समजून घेते.

 तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट – मला वाढदिवसाच्या दिवशी दिलेली भेट.

तिचा आवडता पदार्थ- पिझ्झा, पास्ता असे इटालियन पदार्थ. ती घरीही बनवते.

 ती निराश असते तेव्हा… – मी तेव्हा तिला खाण्याकरिता बाहेर घेऊन जातो.

 एकमेकांसाठी वेळ देता का? – शक्यतो जमेल तेवढा वेळ आम्ही एकमेकांना देतो.

 दोघांचे भेटण्याचे ठिकाण – घर.

 तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण – तिच्याशी लग्न केलं तो क्षण.

 तू चुकतोस तेव्हा ती काय करते? – चूक समजावून सांगते. नाही ऐकलं तर ती ओरडते.

 भांडण झाल्यावर काय करता?- थोडा वेळ शांत राहतो. मग भांडणातून बाहेर येऊन एकमेकांशी पूर्वीसारखंच वागतो.

 दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ? – दोघांनाही येतो.

 तिचं वर्णन – दिसायला सुंदर आहे. तिचे डोळे बोलके आहेत. तिच्या डोळ्यांमध्ये तिला काय बोलायचंय हे पटकन कळतं. राग, प्रेम हे लगेच कळतं. माझ्या मते हेच तिच्या चेहऱयातलं सौंदर्य आहे.

 तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या…-  ज्याच्याकडे संपूर्ण पारदर्शकपणे सगळं व्यक्त करू शकतो, एकमेकांच्या भावनांचा, मतांचा आदर केला जातो ती माझ्या दृष्टीने मैत्री.

 तुला कशी हसवते? –  ती खूप सकारात्मक असल्याने मला हसवण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करावेच लागत नाहीत.

 एकत्र फिरायला जायचे ठिकाण… –  असं काही ठरलेलं नसतं.

 तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली? – तिच्या सकारात्मकतेमुळे मैत्री करावीशी वाटली नाही तर ती आपोआप झाली, वाढत गेली आणि कायमचीच झाली