मैत्रीण…त्याचा खरेपणा भावतो!

नेहा जोशी

तुझा मित्र चिन्मय मांडलेकर

त्याच्यातली सकारात्मक गोष्टतो खूप शांत आणि सकारात्मक आहे. त्याला खूपच कमी वेळा मी चिडताना बघितलंय.

त्याच्यातली खटकणारी गोष्टकामाच्या नादात स्वतःला वेळ कमी देतो असं मला वाटतं.

त्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट‘बेचकी’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आणि ‘ज्योती सावित्री’ या कलर्स मराठीवरील मालिकेतील सावित्रीबाईंची भूमिका सादर करण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे. या दोन्हीचं लिखाण चिन्मयने केलंय. तो लेखक म्हणून मला खूप आवडतो. त्याचं लिखाण सादर करायची मला संधी मिळाली.

त्याच्याकडून काय शिकलीस ?-  त्याच्या कामातला प्रामाणिकपणा आणि त्याचा खरेपणा. मला त्याच्यातला खरेपणा घ्यावासा वाटतो.

 त्याचा आवडता पदार्थमटण

तो निराश असते तेव्हात्याला निराश मी कधी पाहिलंच नाही.

 एकमेकांसाठी वेळ देता का ? – आम्ही ‘भग्न तळ्याकाठी’ हे नाटक एकत्र करतोय. तेव्हा प्रयोग आणि तालमीनिमित्त भेटणं होतं.

 दोघांचे भेटण्याचे ठिकाण –  महाराष्ट्रातली सगळी नाटकाची थिएटर्स आणि चित्रीकरणाचं ठिकाण

त्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण‘बेचकी’ची रंगीत तालीम झाल्यानंतर त्याने मला त्याबद्दल जे सांगितलं होतं तो क्षण.

 तू चुकतेस तेव्हा तो काय करते ? – स्पष्ट तोंडावर माझी चूक सांगतो.

भांडण झाल्यावर काय करता ?- भांडण झाल्यावर व्यवस्थित भांडतो. मग काही वेळानंतर तो शांत होतं आणि मी भांडते.

 दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ? – मला.

तुझी एखादी त्याला आवडणारी सवयमी खूप बोलते आणि खूप मोठय़ाने बोलते.

तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या ?- ज्या नात्यामध्ये आपल्याला कसलीही भीती वाटत नाही. खूप सुरक्षित, आधार आहे, असं वाटतं. सतत भेटलंच पाहिजे, फोन केलेच पाहिजेत, अशा कोणत्याही अपेक्षा इथे नसतात. जिथे खरेपणा आहे, भीती नाही आणि जिथे सुरक्षिततेची भावना आहे ती मैत्री.

 तुला तो कसा हसवतो ? – तो ज्या गोष्टीने मी निराश असेन त्यावरच विनोद करतो आणि मी निराश झालेय ती गोष्ट किती छोटीशी आहे. किती तात्कालिक आहे, कदाचित उद्या हे माझं दुःख नसेल अशा प्रकारे तो विनोद करून मला पटवून देतो.

एकत्र पाहिलेलं नाटक/ सिनेमा ? – आम्ही एकत्र ज्या नाटकात काम करतो तेच नाटक.

त्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली ? – त्याच्याशी मैत्री आपोआप झाली. त्यासाठी काहीच कष्ट करावे लागले नाहीत की ठरवावही लागलं नाही.