खूप खरा , खूप समंजस

सुरुचि अडारकर

तुझा मित्र सौरभ देशमुख

 त्याच्यातली सकारात्मक गोष्ट – तो खूप हुशार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने घेतो. त्याच्यातला हा गुण मला आवडतो.

 त्याच्यातली खटकणारी गोष्ट – पटकन चिडतो.

 त्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट – त्याने मला एकदा वॉलेट दिलं होतं.

 त्याच्याकडून काय शिकलीस? – कुठल्याही गोष्टीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. खूप मेहनती आहे. त्याची मेहनत करण्याची वृत्ती मला आवडते. शाळेत असताना अभ्यासातलं नेहमी तो मला काही ना काहीतरी सांगायचा.

 त्याचा आवडता पदार्थ – तो खूप फुडी आहे, त्यामुळे विशिष्ट एक पदार्थ आवडतो असं नाही सांगता येणार.

 तो निराश असते तेव्हा – त्याला निराश कधीच पाहिलेलं नाही. निराशेच्या प्रसंगातून त्याच्या सकारात्मकतेमुळे पटकन बाहेर येतो, असं मला वाटतं.

 एकमेकांसाठी वेळ देता का? – तो युएसला असल्यामुळे त्याला वेळ नसतो. दररोज भेटणं नाही झालं, तरी खूप वर्षांची मैत्री आहे, त्यामुळे वेगळं काही करून संपर्कात राहण्याची गरज पडत नाही.

 दोघांचे भेटण्याचे ठिकाण – कुठेही भेटतो. जागा महत्त्वाची नसते भेटणं महत्त्वाचं असतं.

 त्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण – शाळेतले अनेक क्षण आहेत. मी, माझी मैत्रीण आणि सौरभ आमचा छोटासा ग्रुप होता. त्यामुळे तो आमचं ऐकायचा. तिथूनच आमची खूप छान मैत्री झाली. तो चिडला, रागावला तर आम्ही त्याला समजवलं की, ऐकायचा. त्याने कधीही कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं नाही.

 तू चुकतेस तेव्हा तो काय करते – पटकन माफ करतो.

 भांडण झाल्यावर काय करतेस? – तो बोलत नाही, भेटत नाही यावरून अनेकदा आमची भांडणं झाली आहेत. भांडण हा मैत्रीचा भाग आहे.

 दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो? – त्याला

 त्याचं वर्णन – खूप खरा आणि छान मित्र. जराही खोटेपणा नसलेला गोड माणूस.

 तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या? – मैत्री ही खूप पारदर्शक असावी. कारण ते एकमेव असं नातं आहे की, जिथे तुम्ही सगळं एकमेकांना सांगू शकता. जिथे तुम्हाला मित्र म्हणून समोरच्याने स्वीकारलेलं आहे.

 तुला तो कसा हसवतो? – छान समजवतो. त्याच्यात समजवण्याचा गुण फार उत्तम आहे. आधी ही बाजू का पाहिली नाही असा विचार मनात येतो.

 त्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली ? – आमचं दोघांचही व्यक्तिमत्त्व फार वेगळं आहे. तरीही आमच्यातील काही गोष्टी एकमेकांना पटायच्या. त्यामुळे शाळेत असतानाच आमची मैत्री खूप छान जमली.