मैत्रिण

प्रियदर्शन जाधव

स्वच्छ मनाची… प्रेमळ…

तुमची मैत्रिण?…मधुरा वेलणकर.

तिच्यातली सकारात्मक गोष्ट?…प्रामाणिक आहे. तोंडावर स्पष्ट बोलते.

तिच्यातली खटकणारी गोष्ट?…तिच्या करीयरमध्ये ती अजून पुढे जाऊ शकली असती. तिच्यात खूप क्षमता आहे.

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट?…‘झेप’ या एकांकिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. हीच माझ्यासाठी तिने दिलेली सुंदर भेट.

तिच्याकडून काय शिकलात?… कुचकट कसं बोलायचं.

तिचा आवडता पदार्थ?…मासे.

ती निराश असते तेव्हा?…ती निराश असते तेव्हा मी सोबत नसतो आणि मला ती कधी निराश दिसली नाही.

एकमेकांसाठी वेळ देता का?…हो, मात्र जमेल तेव्हा.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण?…रुपारेल कॉलेज, मधुराच्या परळच्या घरी किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने भेट झाली आहे.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण?…मी आणि मधुरा ‘मिस्टर ऍण्ड मिसेस’ नावाचं नाटक करत होतो. त्या नाटकासाठी मधुराला मिफ्ताचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता आणि नाटकही सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून निवडलं गेलं होतं. आम्ही अकरावीपासून एकत्र आहोत. व्यावसायिक रंगभूमीवर यश मिळवता आलं, हाच आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण, असं मला वाटतं.

तू चुकतोस तेव्हा ती काय करते?…खूप झापते. वाटेल तशी बोलते. नुकताच मी चुकलोय त्यामुळे मी तिला फोन केलेला नाही. स्वतःच बोलून दमते मग नेहमीसारखी होते.

भांडण झाल्यावर काय करता?…कधीच नाही झालंय, पण भांडणापेक्षा मतभेद होतात.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो?…तिला.

तिचं वर्णन…अत्यंत स्वच्छ मनाची, कामात स्वतःला संपूर्ण झोकून देणारी, सगळ्यांवर खूप प्रेम करणारी.

तुझी एखादी तिला न आवडणारी सवय?…संपर्क न करणं.

तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या?…जे काही वाटेल ते एकमेकांना सांगता आलं पाहिजे.

तुला कशी हसवते?…माझं एक नाटक फारसं चाललं नाही. तेव्हा तिने मला लॉजिकली, प्रॅक्टिकली समजावलं होत. ती स्वतः भावनाशील मुलगी असली तरी इतरांना समजावताना लॉजिकली समजावते.

तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या?…जे काही वाटेल ते एकमेकांना सांगता यायला हवं.

एकत्र फिरायला जायचे ठिकाण?…रुपारेल महाविद्यालय.

तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली?..मधुरा महाविद्यालयात असताना मला एक वर्ष ज्युनियर होती. तरीही आमचं छान जुऴलं. एकमेकांशी गप्पा मारायचो. एका ग्रुपमधून आम्ही खूप नाटकं केली.