मैत्रीण

चंद्रकांत कुलकर्णी..  माझी आई माझी मैत्रीण

तुमची मैत्रीण..  उषा कुलकर्णी (माझी आई)

 तिच्यातली सकारात्मक गोष्ट..प्रतिकूल परिस्थितीची तिला भीती वाटली नाही.

 तिच्यातली खटकणारी गोष्ट.. ती माझ्या आयुष्यातून खूप लवकर निघून गेली. खूप कष्ट केल्यानंतर जेव्हा सगळं उपभोगायची संधी आली तेव्हा ती नव्हती.

तिच्यातली आवडणारी गोष्ट.. तिची जगण्याची जिद्द, आनंद घेणं आणि देणं.

 तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट.. तिने मला दिलेला जन्म हीच माझ्यासाठी सगळ्यात सुंदर भेट.

 तिच्याकडून काय शिकलात?..तिच्यातल्या सर्व सकारात्मक गोष्टी माझ्यात आल्या असं मला वाटतं.

 तिचा आवडता पदार्थ.. खमंग पदार्थ.

 ती निराश असायची तेव्हा…ती निराश नसायचीच. दुर्धर आजाराशीही ती १९ वर्षे लढत होती.

 तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण ः संभाजीनगरहून मी मुंबईला करीयरसाठी आलो त्यामध्ये तिचा वाटा महत्त्वाचा होता. त्यामुळे तिची ‘चंदूची आई’ या मथळ्याखाली  ‘लोकसत्ता’ने मुलाखत घेतली होती. मला मिळालेल्या बक्षिसामुळे तिच्या चेहऱयावरचा आनंद खूप टिपण्यासारखा असायचा हे मी कधी विसरू शकत नाही.

 तुम्ही चुकता तेव्हा ती काय करायची?.. मार देणे, अबोला ठेवणे अशा शिक्षा करायची.

भांडण झाल्यावर काय करायची ?..आमचं एकमेकांशी कधीच भांडण झालं नाही.

 दोघांपैकी जास्त राग कोणाला यायचा?..दोघांनाही सारखाच राग यायचा.

 तिचे वर्णनमाझी आई म्हणजे माझ्यापेक्षा १६ वर्षांनी मोठी असणारी माझी सगळ्यात पहिली मैत्रीण. अत्यंत प्रसन्न चेहऱयाची. शिक्षण कमी असलं तरी प्रचंड आत्मविश्वासाने वावरणारी होती.

 तुमची एखादी तिला न आवडणारी सवयः मी इतरांना वेळ देत नाही, माझ्या दैनंदिन वेळापत्रकात शांतता नाही हे तिला आवडायचं नाही.