मैत्रीण

गौरव घाटणेकर…तू माझ्या आयुष्याची पहाट!

तुझी मैत्रीण  श्रुती मराठे

 तिच्यातली सकारात्मक गोष्ट तिला माझ्यातील नकारात्मक गोष्टी माहिती आहेत. ती मानसिकदृष्टय़ा खूप स्थिर आहे. खूप शांत आहे. तिला जे सांगायचं असतं ते ठामपणे सांगते.

 तिच्यातली खटकणारी गोष्ट ती तिच्या फिटनेसची जास्त काळजी घेत नाही, त्यासाठी मला तिचा पाठपुरावा घ्यावा लागतो.

 तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट तिने दिलेले परफ्युम. कारण ते ती तिच्या आवडीचे देते.

तिच्याकडून काय शिकलात? – मी तिच्याकडून सकारात्मक आणि स्थिर राहायला शिकलो. कधी तुमच्याकडे काम असेल किंवा कधी नसेल तर तुम्ही एवढेही निराश होऊ नका की तुम्हाला कोणीच विचारणार नाही, हा तिच्यातील गुण खूप चांगला आहे.

 तिचा आवडता पदार्थ मांसाहारी पदार्थ

 ती निराश असते तेव्हा माझ्याशी बोलणं बंद करते.   

 तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण एकदा ती आजारी असल्यामुळे रुग्णालयात होती. तेव्हा मला तिचे माझ्या आयुष्यातील महत्त्व कळते.

 तू चुकतोस तेव्हा ती काय करते माझी चूक मला ठामपणे तोंडावर सांगते. चूक कशी सुधारायला हवी हेही सांगते.

 भांडण झाल्यावर काय करता ?- मी दोन मिनिटांत शांत होतो, पण ती एक-दोन दिवस त्यावरच विचार करत राहते.

 दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो? – तिला

 तिचं वर्णन – ‘श्रुती इज अ कम्प्लिट वुमन’ हे तिचं एका शब्दात करता येण्यासारखं वर्णन आहे.

 तुझी एखादी तिला आवडणारी सवय आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा मी तिला माझ्यासाठी गाडी चालवायला सांगितलेलं तिला आवडत नाही.